'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (12:30 IST)
'पेटीएम पेमेंट्‌स बँक लिमिटेड'ला रिझर्व बँकेकडून 31 डिसेंबर 2018 पासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी 'केवायसी' सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे.
 
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार आहेत. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडने वरिष्ठ बँकर सतीश गुप्ता यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. गुप्ता यापूर्वी एसबीआय आणि नॅशनल पेंट्‌स कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते. गुप्ता   म्हणाले, प्रत्येक भारतीयापर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. डिजिटलचा स्वीकार करण्यात मदत करणे आणि जास्तीत जास्त लोकांना डिजिटल व्यवहारांची माहिती देणे हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था समावेशक होण्यास मदत होईल. पेटीएम पेमेंट्‌स बँकेच्या ग्राहकांना मोफत बँकिंग सेवेसह बचतीवर वार्षिक चार टक्के व्याज दिले जाते. बँकेतर्फे आपल्या ग्राहकांना खात्यात एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्याची मुभा असून अन्य वैशिष्ट्यांमध्ये व्हर्चुअल पासबुक, डिजिटल, डेबिट कार्डचा समावेश आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती