आंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात

सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (16:57 IST)
राजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेश सरकारनेही वाढत्या इंधनदरामुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रूपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. ही दरकपात मंगळवार सकाळपासून लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थान सरकारनेही रविवारी ४ टक्क्यांनी मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली होती. दरम्यान, वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने इंधन दराबाबत हात वर केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती