द्रविड सारखा संयम दाखवा आर.बी.आय. ला रघुराम राजन यांचा सल्ला

बुधवार, 7 नोव्हेंबर 2018 (09:13 IST)
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेतील वाढत्या तणावाबाबात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राघुराम राजन आपले मत व्यक्त केले आहे. जे काही सध्या घडत आहे, ही परिस्थिती पाहाता रिझर्व्ह बँकेने राहुल द्रविडसारखे गंभीरतेने आणि अचूक निर्णय घेतले पाहिजे. नवज्योतसिंग सिद्धूसारखी धरसोड, बोलघेवडेपणाची भूमिका घेऊ नकाच असा सल्ला राजन यांनी दिलाय. देशाच्या आर्थिक संकटातून, केंद्र सरकारशी असलेल्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अशी भूमिका घ्यावी त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँक ही केंद्र सरकारसाठी सिटबेल्टसारखी आहे. दुर्घटना रोखण्यासाठी सिटबेल्ट महत्वाचा असतो. मात्र, त्याचा वापर करावा किंवा नाही याचा निर्णय सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती