पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरूस्ती,२६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान वाहतूक बंद

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी  २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान  वाहतूक बंद असणार आहे. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचं काम होणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय १३ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या पुण्यापर्यंत तसंच पुण्याहून पुढे धावणार आहे. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून मुंबईहून सुटणाऱ्या या गाड्या पुण्याहून सोडल्या जातील. याशिवाय पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसंच भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती