पुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड

गुरूवार, 17 जानेवारी 2019 (16:40 IST)
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'वर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना दिलेल्या केवायसी आणि फसवणूक वर्गीकरण नियम पूर्तता न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने यासंदर्भात माहीती दिली आहे. बॅंकेने रिझर्व बॅंकेच्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठोठावल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. नियमांचे पालन केल्याने ही कारवाई असल्याने ग्राहक आणि बॅंकेचे व्यवहार, करार, वैधता यावर कोणतीही शंका उपस्थित केली नाही. याआधी आरबीआयने गेल्यावर्षीही बॅंक ऑफ महाराष्ट्रवर एक कोटींचा दंड ठोठावला होता. एका खात्यामध्ये घोटाळा समोर आल्यानंतर बॅंकेकडून हे प्रकरण मिटवायला विलंब करण्यात आल्याने हा दंड ठोठावण्यात आला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती