ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन

शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (17:35 IST)
बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. येत्या सोमवारी परळमधून मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. कंपनीने दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत, तसेच अपेक्षित भाडे मिळत नसल्याने दिवाळीपूर्वी ओला, उबरच्या चालकांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मध्यस्थी करून कंपन्यांना भाडे वाढवून देण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही अपेक्षित भाडे मिळत नाही अशी तक्रार चालक करत आहेत. चालकांनी 22 ऑक्‍टोबरला सुरू केलेला बंद 12 दिवस चालला होता.चालकांनी किमान 100 ते 150 रुपये भाडे आणि किलोमीटरला 18 ते 23 रुपयांचा दर देण्याची मागणी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती