LPG गॅस 100 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली - सामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी म्हणजे विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे भाव 100.50 रुपयांनी कमी झाले असून अनुदानित गॅस सिलेंडरचे भाव 3.02 रुपयांनी कमी झाले आहेत. एक जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 
 
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सां‍गितले की मध्य रात्री पासून या किमती लागू झाल्या असनू आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत. यामुळे दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठीचा सिलेंडर 637 रुपयांना मिळणार आहे. 
 
अनुदानित सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर घेताना बाजार मूल्य द्यावं लागतं. यानंतर अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होतं. ग्राहकांना एका वर्षात 12 अनुदानित सिलेंडर मिळतात. एलपीजी दरांमध्ये घट झाल्यामुळे ग्राहकांना 142..65 रुपयांचं अनुदान मिळेल. यामुळे एलपीजीचे दर 494.35 रुपये होतील. 
 
जून महिन्यात याची किंमत 737.50 रुपये होती. इतर शहरांमध्ये देखील किमत कमी झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती