अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट सेक्टरला मोठा दिलासा दिला आहे. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली.

कपातीनंतर कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. यातील २२ टक्के मुलभूत कर असणार आहे. लवकर या निर्णयाबाबत अध्यादेश काढण्यात येईल, असे सीतारमण म्हणाल्या. दरम्यान, सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली. बीएसईचा प्रमुख निर्देशांक १६०० अंकांनी उसळून ३७,७६७.१३ वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात आलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे थोडीबहुत दूर झाली.
 
कराचे नवे दर हे चालू आर्थिक वर्षापासूनच लागू होणार आहेत. कंपनी करात कपात केल्यानंतर वार्षिक महसून १.४५ लाख कोटी राहणार असल्याचं सीतारामन म्हणाल्या. गुंतवणूक आणि विकास दर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. दि.१ ऑक्टोबरनंतर सुरू होणाऱ्या उत्पादन कंपन्यांकडून १५ टक्के कंपनी कर आकारण्यात येणार आहे. सरचार्ज आणि सेससह हा दर १७.०१ टक्के होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती