सोने खरेदीचा नवा नियम, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य

बुधवार, 15 जानेवारी 2020 (10:36 IST)
केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याविषयीचे काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. १५ जानेवारी २०२०पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 
 
यासाठी अधिकृत नोंद ठेवण्यात येते. नव्या नियमांअंतर्गत यापुढे सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणं बंधनकारक असणार आहे. ज्यासाठी ज्वेलर्स, सोनारांना परवाना घ्यावा लागणार आहे. 
 
यापूर्वी देशात दागिन्यांवर हॉलमार्क लावणं हे ऐच्छिक होतं. पण, आता हा नियम लागू झाल्यावर मात्र कोणत्याही सोन्याच्या दागिन्याची विक्री होण्यापूर्वी त्यावर हॉलमार्क असणार आहे. देशातील २३४ जिल्ह्यांमध्ये ८९२ हॉलमार्किंग केंद्र सुरु करण्य़ात आली आहेत. तेव्हा सोनार, ज्वेलर्स यांच्यापैकी कोणाकडूनही ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे. 
 
सध्या १ लाख रुपये दंड, जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पाच टक्के दंड किंवा एका वर्षाचा कारावास किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती