March Bank Holidays: मार्चमध्ये एक-दोन दिवस नव्हे तर एकूण 18 दिवस बँका बंद राहणार! येथे संपूर्ण यादी पहा

गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (12:31 IST)
March Bank Holidays List: बँकांच्या वार्षिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आगाऊ जाहीर केली आहे. तर दर महिन्याच्या सुरुवातीला बँकांच्या सुट्ट्यांची यादीही प्रसिद्ध केली जाते. यावर्षी 2024 मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बँका बराच काळ बंद राहिल्या. तर मार्चच्या सुरुवातीच्या दिवसातही बँकेला सुट्टी असेल. बँका एक-दोन दिवस नाही तर 18 दिवस बंद राहणार आहेत.
 
मार्चमध्ये चापचर कुट, महाशिवरात्रि, होळी यासह अनेक सण येत आहे. या काळात Regional आणि Public सुट्ट्या असल्याने बँकाही बंद राहणार आहेत. मार्चमध्ये एकूण 18 दिवस बँका बंद राहतील आणि यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या, प्रादेशिक सुट्ट्या, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार (साप्ताहिक सुट्ट्या) यांचा समावेश आहे.
 
1 मार्च रोजी चापचर कुट
8 मार्च रोजी महाशिवरात्रि
25 मार्च रोजी होळी
29 मार्च रोजी गुड फ्राइडे
 
मार्चमध्ये एकूण 18 दिवस बँकांना सुट्ट्या !
तारीख- दिन- सुट्टी- राज्य आणि राष्ट्रीय अवकाश
1 मार्च-शुक्रवार- चापचूर कुट-मिझोरम
3 मार्च-रविवार- साप्ताहिक सुट्टी- राष्ट्रीय अवकाश
6 मार्च - बुधवार- महर्षि दयानन्द सरस्वती जयन्ती- प्रतिबंधित अवकाश
8 मार्च-शुक्रवार - महा शिवरात्रि/शिवरात्रि- राष्ट्रीय अवकाश
9 मार्च- शनिवार- दूसरा शनिवार -राष्ट्रीय अवकाश
10 मार्च- रविवार-साप्ताहिक छुट्टी-राष्ट्रीय अवकाश
12 मार्च- मंगळवार- रमझान सुरुवात- प्रतिबंधित अवकाश
17 मार्च- रविवार- साप्ताहिक-पूरे देश में बैंक की छुट्टी
20 मार्च- बुधवार- मार्च विषुव पालन- काही राज्यांमध्ये बंद
22 मार्च- शुक्रवार-बिहार दिवस- बिहार
23 मार्च- शनिवार-भगत सिंह शहादत दिवस/ चवथा शनिवार- राष्ट्रीय अवकाश
24 मार्च- रविवार- होलिका दहन राजपत्रित अवकाश
25 मार्च- सोमवार- होळी/डोलयात्रा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, मणिपूर, केरळ, नागालँड, बिहार, श्रीनगर वगळता सर्वत्र बँका बंद राहतील.
26 मार्च- मंगळवार-याओसांग, ओडिशा, मणिपुर, बिहार
27 मार्च- बुधवार- होळी- बिहार
28 मार्च- गुरुवार- पुण्य गुरुवार पालन, काह राज्यांमध्ये सुट्टी
29 मार्च- शुक्रवार- गुड फ्रायडे, त्रिपुरा, असम, राजस्थान, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश सोडून सर्वजागी बंद
31 मार्च- रविवार- ईस्टर दिवस/साप्ताहिक सुट्टी राष्ट्रीय अवकाश
 
बँकेच्या सुट्टीत कोणत्या गोष्टी करता येतील?
जर तुमच्या राज्यात किंवा शहरात बँक बंद असेल, तर तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी कोणाशी संपर्क साधू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे ऑनलाइन बँकिंगची सुविधा असणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन बँकिंग सेवेद्वारे पैशांचा व्यवहार करू शकता. तर, तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती