जन धन खात्यामुळे व्यसनामध्ये मोठी घट

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (16:54 IST)

जन धन खात्यामुळे ग्रामीण भागात दारू आणि तंबाखूचे सेवन करण्याच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमी रिसर्च विंगने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.  नोटबंदी झाल्यानंतर नोव्हेंबर 2017पर्यंत 30 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. देशातील 10 राज्यात 23 कोटी (75 टक्के) खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक खाती उत्तर प्रदेश (4.7 कोटी), त्यानंतर बिहार (3.2 कोटी) आणि पश्चिम बंगालमध्ये (2.9 कोटी) या राज्यात उघडण्यात आली आहेत.

कज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित या अहवालात एसबीआयने जन धन खात्यामुळे आणि नोटबंदीमुळे नागरिकांचा बचत करण्याकडे अधिक कल असल्याचे म्हटले आहे. ज्या राज्यात जन धन खाती अधिक उघडण्यात आली आहेत, अशा राज्यात मद्य आणि तबांखूच्या विक्रीमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येते. नोटबंदीनंतर खर्च कमी करून अधिक बचत करण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसते. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात ऑक्टोबर 2016पासून वैद्यकीय खर्च वाढल्याचे एसबीआयने म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती