आयकर रिटर्न भरले नाही, मग आताच भरा

मंगळवार, 19 जून 2018 (17:26 IST)

करदाते ज्यांचं वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रूपयांपेक्षा अधिक आहे, आणि ज्यांना ऑ़डिट करायचं नाहीय, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै निश्चित करण्यात आली आहे. सरकारने आयकर अधिनियमात या वर्षापासून कलम '२३४ एफ' जोडलेला आहे. या कलमानुसार जर करदाता ३१ जुलैपर्यंत रिटर्न फाईल करणार नसेल, तर त्या तारखेनंतर ३१ डिसेंबरच्या आत त्याने रिटर्न फाईल केला, तर त्याला विलंब फी १० हजार रूपये आकारण्यात येणार आहे.

मात्र यात लहान करदाते ज्यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाख रूपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी १ हजार रूपये शुल्क आकारण्यात येईल. हा कर करदात्याला स्वानुकूल करासोबत भरावा लागणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती