पुण्यात जनरल मोटर्सने 1419 कर्मचाऱ्यांची केली कपात

मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:18 IST)
यंदाही कोरोनाने कहर केला आहे. रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. यामुळे याचा परिणाम आता उद्योग धंद्यावर होत आहे. 
 
तर पुण्यामध्ये जनरल मोटर्स इंडियाने तब्बल १४१९ कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. शुक्रवारी तळेगाव प्लांटमधील असणाऱ्या सर्व कामगारांना कामावरून कपात केलीय. यामुळे वाद सुद्धा निर्माण होऊ शकतो. तर औद्योगिक विवाद कायदाच्या सेक्शन २५ अन्वये ही कारवाई केली आहे. या निर्णयाला आता कामगार युनियन कायदेशीर आव्हान देणार असल्याचे समोर आले आहे.
 
इकॉनॉमिक्स टाइम्स माहितीनुसार, पुण्यातील जनरल मोटर्सने एक ईमेल पाठवून सर्व १४१९ कामगारांना ले-ऑफ नोटिस पाठवण्यात आली आहे. त्याची १ कॉपी जनरल मोटर्स कर्मचारी युनियन सचिव आणि अध्यक्षांनाही दिली गेली आहे. तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांना मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या ५० टक्के भरपाईही दिली जाणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच, कंपनीने मागील, ४ महिन्यात एकही वाहन तयार केलं नाही. तरीही कर्मचाऱ्यांना वेतन दिलं.आम्ही कर्मचाऱ्यांना आवश्यकतेपेक्षा अधिक सेपरेशन पॅकेजची ऑफर दिली आहे. 
 
या दरम्यान, तळेगाव प्लांटमधील प्रोडक्शन २४ डिसेंबर २०२० पासून बंद केलं होतं. तर कंपनीने उत्पादन बंद करण्याबाबत कर्मचाऱ्यांना १ वर्ष अगोदरच याबाबत माहिती देण्यात आली होती. तर पुन्हा उत्पादन सुरु कऱण्याची शक्यता नसल्याचंही सांगण्यात आलं. मागील ४ महिन्यांपासून उत्पादन काहीच नसताना सुद्धा कर्मचाऱ्यांना वेतनापोटी दहा कोटी महिन्याला खर्च केला असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती