एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डची लेट फी वाढणार

बुधवार, 6 मार्च 2019 (14:31 IST)
एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणार्‍या ग्राहकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून चाट पडणार आहे. क्रेडिट कार्डावरील विलंब शुल्क वाढवण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने घेतला आहे. नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत.
 
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर ही माहिती मिळते. यानुसार, इन्फिनिया कार्ड वगळता अन्य सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डांवर नवे दर लागू होणार आहेत. दिलेल्या विहित तारखेच्या आत जर क्रेडिट कार्ड बिलाची किमान रक्कम भरली गेली नाही किंवा बँकेच्या कार्ड अकाउंटमध्ये विहित तारखेपर्यंत पेमेंट केले गेले नाही तर हे विलंब शुल्क लागू होते. मात्र हे विलंब शुल्क इन्फिनिया क्रेडिट कार्डावर लागू होणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती