Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर कमी झाले, जाणून घ्या आजचे दर

बुधवार, 24 एप्रिल 2024 (16:15 IST)
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. MCX वर सोन्याचा भाव आज ₹70451 प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. चांदीच्या दरातही आज एक हजार रुपयांनी घट झाली.

गेल्या काही दिवसांत सोने चांदीच्या किमती वधारला विक्रमी वाढी नंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रामच्या वर आहे. मात्र शुक्रवार पासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. तीन दिवसांत सोन्याचे दर 70451 हजार रुपये झाले आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली आहे.  

सध्या लग्नसराई सुरु आहे. या काळात सोन चांदी खरेदी करणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्यासोबत चांदीचे दर देखील गेल्या तीन दिवसांत 80 हजाराच्या खाली आले आहे. आज चांदीच्या किमती 1000 रुपयांनी कमी झाले आहे. 19 एप्रिल रोजी चांदीच्या किमती 83507 रुपये प्रतिकिलो होती.आता घसरून 79581 रुपये झाले आहे.

सोमवारी सोन्याचा भाव 1,300 रुपयांनी घसरून 71,522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.  तर मंगळवारी  सोन्याचे दर 746 रुपयांनी घसरून 70451 रुपये झाले आहे.तीन दिवसांत सोन्याच्या किमती 2355 रुपये प्रति 10 ग्रॅम ने कमी झाला आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती