लॉकडाऊन : गो एअर विमान कंपनी संकटात

सोमवार, 20 एप्रिल 2020 (13:33 IST)
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांचे लॉकडाऊन झाले असून आता जेट एअरवेजनंतर आता गो एअर ही विमान कंपनीसुद्धा डबघाईला आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या गो एअर विमान कंपनीने त्यांच्या 5,500 कामगारांपैकी 90 टक्के कामगारांना म्हणजे जवळजवळ पाच हजार कामगारांना अनिश्चित काळासाठी घरी बसविण्याचे ठरविले आहे.

या काळात गो एअर विमान कंपनी त्यांच्या कामगारांना पगार देणार नाही. त्यामुळे आधीच बेकारीच्या खाईत लोटल्या गेलेल्या विमान सेवेतील कर्मचाऱ्यांचे आतोनात हाल झाले आहेत.  14 तारखेला निदान विमानसेवा सुरू होईल या आशेवर गो एअर कंपनी होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्याचप्रमाणे वीस तारखेपासून काही उद्योगांना सुरू करण्याची परवानगी दिली असली तरीही विमान उड्डाणांना परवानगी दिलेली नाही. शनिवारी नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी ही घोषणा केल्यामुळे विमानांनी सुरू केलेली ॲडव्हान्स बुकिंगही थांबविण्यात आली होती. या बिकट परिस्थितीमुळे कंपनीने शेवटी आर्थिक अरिष्टातून वाचण्यासाठी कामगारांनाच घरी बसविण्याचे ठरविले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती