भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

मंगळवार, 2 जून 2020 (16:56 IST)
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग बीएए ३ केली आहे.
 
मागील काही कालावधीपासून भारत आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी वृद्धी करत आहे. तसेच कर्जाचं ओझं वाढत असून कर्जाची परतफेड होण्यात अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे वित्तीय प्रणालीवर दबाव येणार असल्याचं भाकितही मूडीजनं केलं आहे. 
 
बीएए ३ रेटिंग म्हणजे गुंतवणूक ग्रेड मानली जात आहे. भारतात गुंतवणूक ग्रेड असणारी अर्थव्यवस्था काही काळ राहील. मूडीजनं २०१७ मध्येच रेटिंग वाढवून बीएए २ केली होती. पण, सॉवरिन क्रेडीट प्रोफाईल पोषक नाही. विशेष म्हणजे मूडीजचा अंदाज कोरोनामुळे वर्तवला नाही. तर मागील वर्षीच हा अंदाज वर्तवला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती