स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी, एटीएममधून हवे तेवढे पैसे काढा

बुधवार, 5 डिसेंबर 2018 (08:46 IST)
स्टेट बँकेच्या ग्राहकांना आतापर्यंत एटीएममधून पैसे काढताना काही बंधने होती. मात्र आता ग्राहकांना दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत. यासाठी बँकेने एक अट घातली आहे.
 
एटीएममधून हवे तेवढे पैसे काढायचे असल्यास खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार आहे. अनलिमिटेड एटीएम व्यवहार करण्यासाठी दर महिन्याला सरासरी 1 लाख रुपये ठेवणे बंधनकारक आहे. तरच ग्राहक एटीएम कार्डद्वारे अनलिमिटेड व्यवहार करू शकता. ग्राहकांना दर महिन्याला काही ठराविक वेळा फ्री आणि अनलिमिटेड व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी असा आदेश रिझर्व्ह बँकेने एसबीआयला दिला आहे.
 
स्टेट बँकेने याआधी 31 ऑक्टोबर 2018 पासून आपल्या 'क्लासिक' आणि 'माइस्ट्रो' या डेबिट कार्डधारकांसाठी एटीएममधून रक्कम काढण्याची दैनंदिन मर्यादा 40 हजार रुपयांवरून 20 हजार रुपयांवर आणली आहे. सध्या एसबीआयचे ग्राहक दर महिन्याला आठ वेळा एटीएमने व्यवहार करू शकतात. त्यातील पाच वेळा ग्राहकांना एसबीआयची एटीएम मशीन वापरावी लागते. तर तीन वेळा ते इतर कोणत्याही ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती