शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'

शुक्रवार, 13 मार्च 2020 (11:44 IST)
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ३४०० अंकांनी कोसळला. निफ्टीत ९०० अकांहून अधिक घसरण झाली होती. त्यामुळे शेअर बाजाराचे ट्रेडिंग ४५ मिनिटांसाठी रोखण्यात आले. यात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, बाजार ४५ मिनिटांनंतर पुन्हा सुरु झाला आणि निर्देशांक सावरले. आजचा दिवस बाजारासाठी 'ब्लॅक फ्रायडे' ठरला
 
भारतात करोना विषाणूचा पहिला बळी गेल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम पाहता गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवला. यामुळे १९८७ नंतर प्रथमच बाजारात इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली. 
 
आज बाजार उघडताच निफ्टी 966 टक्क्यांनी कोसळला आणि त्याला लोअर सर्किट लागले. तो 8624 अंकांपर्यंत खाली आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3400 अंकांनी कोसळला आणि तो 29 हजार 200 अंकांपर्यंत खाली आला. निर्देशांक 10 टक्क्यांहून जास्त कोसळल्याने त्यात आणखी घसरण होऊ नये म्हणून शेअर बाजाराने 45 मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद ठेवले होते.
 
कोरोनाने आशियातील सर्वच बाजारात कहर केला आहे. थायलँड, दक्षिण कोरिया, फिलिपाइन्स या देशांमधील भांडवली बाजारात निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. तसेच गुरुवारी अमेरिकेतील शेअर निर्देशांक 10 टक्क्यांनी कोसळले होते. त्याचे पडसाद भारतीय बाजारांवर उमटले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती