सायकल कंपनी अ‍ॅटलासने आर्थिक अडचणींमुळे काम थांबवले

गुरूवार, 4 जून 2020 (22:32 IST)
जागतिक सायकल दिनाच्या दिवशी अर्थात 3 जून ला प्रसिद्ध (Atlas Cycles Announces Temporary Lay-off) सायकल कंपनी अ‍ॅटलासने आर्थिक अडचणींमुळे कारखान्यातील (हरियाणा) काम थांबवलं आहे. 69 वर्ष जुन्या या कंपनीमध्ये उत्पादन ठप्प झाल्याने कंपनीच्या 1000 कर्मचाऱ्यांसमोर पोटापाण्याचं मोठं संकट उभं राहिलं आहे. एकेकाळी याच कंपनीने वर्षाला 40 लाख सायकल बनवल्याचा विक्रम केला होता. मात्र, आता याच कंपनीच्या संचालकांकडे कारखाना चालवण्यासाठी पैसे नसल्याचं कंपनीच्या ले-ऑफ नोटीसमध्ये सांगण्यात आलं.
 
कंपनीकडे सध्या कच्चा माल खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ले-ऑफ करण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना उपस्थिती नोंदवून परत जावं लागतं. म्हणजे कारखान्यात काम बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना रोज त्यांच्या-त्यांच्या वेळी कारखान्यात येऊन आपली उपस्थिती नोंदवायची असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती