आजपासून सलग तीन दिवस बँक बंद

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी शुक्रवार अर्थात आज आणि (१ फ्रेबुवारी) शनिवार अशी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. तर २ फ्रेबुवारीला रविवार असल्यामुळे आठवडा अखेर सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या ३१ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर शनिवारी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र ‘बजेट’च्या दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे आठवडाअखेर तीन दिवस बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘इंडियन बँक असोसिएशन’सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.
 
दुसरीकडे फेब्रुवारीत तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात ६ सार्वजनिक सुट्ट्या असून दुसरा आणि चौथा शनिवार-रविवार आणि १ फेब्रुवारीचा संपाचा दिवस, असे ११ दिवस बँका बंद असतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती