मारुती सुझुकीचा एक नवा रेकॉर्ड

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (08:55 IST)
मारुती सुझुकीने आपल्या छोट्या कारद्वारे एक नवा रेकॉर्ड केला आहे. मारुती सुझुकीच्या लोकप्रिय ऑल्टो कारने विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. मारुती सुझुकीने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑल्टोची विक्री 40 लाख यूनिट्सवर गेली असून यासह ऑल्टो भारतात 40 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री करणारी पहिली कार ठरली आहे.
 
मारुतीची ही छोटी कार 20 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. जी 16 वर्षांपासून भारतात टॉप-सेलिंग म्हणजेच सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुति ऑल्टोने 2008 मध्ये 10 लाख यूनिट्स विक्रीचा आकडा पार केला होता. 2012 मध्ये 20 लाख यूनिट्स आणि 2016 मध्ये 30 लाख यूनिट्सपर्यंत विक्री पोहचली होती. 
 
BS6 नॉर्म्स पूर्ण करणारी ही देशातील पहिली एन्ट्री लेवल कार ठरली आहे. मारुतीने दिलेल्या माहितीनुसार, '76 टक्के ग्राहक त्यांची पहिली कार म्हणून ऑल्टोची निवड करतात. ऑल्टो भारतीय ग्राहकांच्या पसंतीची कार असून, किंमत परवडणारी असण्याबरोबरच, सोयीस्करही आहे'.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती