General Motors च्या 46,000 वर्कर्सने काम करणे बंद केले, 12 वर्षांमध्ये ऑटो सेक्टरचा सर्वात मोठा संप

मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (15:37 IST)
जनरल मोटर्सविरुद्ध युनाइटेड ऑटो वर्कर्स (UAW) श्रमिक संगटनाने सोमवारी अमेरिकेत संप सुरू केला आहे. चर्चा विफल झाल्यामुळे कर्मचारी संपावर गेले आहेत. अमेरिकेच्या 9 राज्यांमध्ये स्थित कंपनीचे 33 मॅन्युफॅक्चरिंग प्लांटशिवाय 22 पार्ट्स डिस्ट्रीब्यूशन वेयर हाउसेसचे किमान 49,000 कर्मचारी रविवारी संपावर गेले आहेत. 
 
UAW ने ट्विट करून ही माहिती दिली होती की स्थानीय श्रमिक संगटनाच्या नेत्यांनी डेट्रोएटची भेट घेऊन रविवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर एक प्रेस परिषदमध्ये संगटनाचे प्रमुख वार्ताकार टेरी डिटेस ने म्हटले, 'हा आमचा शेवटचा प्रयास आहे. आम्ही या देशात लोकांच्या काम करण्याच्या मूलभूत हक्कासाठी आहोत.
 
या संपाच्या सुरू होण्याअगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विट करून सांगितले की जनरल मोटर्स आणि यूनाइटेड ऑटो वर्कर्समध्ये एकदा परत विवाद सुरू झाला आहे. दोघांना सोबत यायला पाहिजे आणि प्रकरण मिटवले पाहिजे.
 
जनरल मोटर्सचे बयान
या संपाबद्दल जनरल मोटर्सने म्हटले, 'हे फारच निराशाजनक आहे की UAW लीडरशिपने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, आम्ही कॉन्ट्रॅक्ट  नेगोशिएशंसमध्ये चांगला ऑफर सादर केला होता.' कंपनीने शनिवारी अमेरिकी प्लांट्समध्ये 700 कोटी डॉलर गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. सध्या अमेरिकी कार उद्योग देखील मंदीच्या स्थितीत आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणुकीशी संबंधित वाढती किंमत आणि उत्सर्जनावर अंकुश येऊ लागला आहे.
2007 मध्ये झाला होता 30 कोटी डॉलर्सचे नुकसान
अमेरिकेच्या ऑटो उद्योगात 12 वर्षांमध्ये काम बंदीची पहिलीच घटना आहे. या अगोदर युनियनने मागची देशव्यापी संप 2007 मध्ये केली होती.  त्या वेळेस किमान 73,000 वर्कर्सने दोन दिवस कामावर जाण्यास मना केले होते ज्याचा परिणाम कंपनीला किमान 30 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती