नवीन Honda Activa 125 BS6 आज भारतात होईल लाँच, जाणून घ्या त्याची किंमत

बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (14:15 IST)
होंडा मोटरसायकिल एंड स्कूटर इंडिया भारतात आपले नवीन Activa 125 BS6 ला लाँच करत आहे. या इवेंटमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी देखील त्यांची उपस्थिती नोंदवणार आहे. नवीन एक्टिवा 125 देशाचा दुसरा 125cc इंजिन असणारा स्कूटर असेल ज्यात फ्यूल इंजेक्शन तंत्राला सामील करण्यात आले आहे. या अगोदर Hero Maestro Edge 125 Fi बाजारात आला आहे.   
 
सोर्सप्रमाणे नवीन Activa 125 मध्ये 125cc चा नवीन BS6 नॉर्म्स असणारा इंजिन मिळेल आणि यात फ्यूल-इंजेक्शन तंत्राला देखील सामील करण्यात आले आहे. हे इंजिन 8.4 bhp चे पावर आणि 10.54 Nm चा टॉर्क देईल. हा आपल्या सध्याच्या रेगुलर मॉडलपेक्षा 10 टक्के जास्त मायलेज देणार आहे.  
असे मानले जात आहे की ग्राहकांच्या सुविधेसाठी नवीन Activa 125 मध्ये फ्यूल फिलर कॅप एक्स्टर्नल दिला जाईल. एवढंच नव्हे तर यात मल्टी-फंक्शन इग्निशन Keyचा वापर करण्यात येईल. ज्याच्या मदतीने तुम्ही सीटला खोलू शकता. तसेच यात साइड स्टँड इंडिकेटर अलर्टची सुविधा देखील मिळणार आहे. यात एक नवीन स्पीडोमीटरदेखील मिळणार आहे जो एनालॉग आणि डिजीटल पार्टमध्ये असेल. असे मानले जात आहे की कंपनी Activa 125 BS6 ला 66 हजार रुपयांच्या सुरुवातीतील किंमत मध्ये बाजारात आणेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती