शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म केल्यास वाईट फल प्रदान करतात. शनिवार हा दिवस शनि देवाचा मानला गेला आहे. आणि जर कुंडलीत शनिदोष असेल तर त्या व्यक्तीने शनिवारी काही पदार्थ असे आहेत जे खाणे टाळावे. अर्थातच शनिदेवाला खूश करायचे असेल तर शनिवारी हे पदार्थ खाऊ नये. कोणते आहे ते पदार्थ बघू या:
 
जर आपण शनिवारी दूध किंवा दही सेवन करू इच्छित असाल तर दूध आणि दह्याचे तसेच सेवन करू नये. त्यात हळद किंवा गूळ मिसळून सेवन करावे.
 
या दिवशी आंब्याचं लोणचे खाणे टाळावे. कारण कच्चा आंबा म्हणजे कैरी आंबट आणि एकाप्रकारे तुरट असते. आणि शनिला अश्या वस्तूंचे विरोधी आहेत.
 
शनिवारी लाल मिरची वापरू नये. याने शनि देव नाराज होतात.
 
तसेच शनिवारी चणे, उडद आणि मूग डाळ खायला हरकत नाही परंतू मसूर डाळ खाणे टाळावे. कारण ही डाळ मंगळ प्रभावित आहे आणि याने शनिची क्रूर नजर वाढते.
 
तसेच शनिवारी नशा म्हणजे मद‌िरापान करू नये. याने आपल्या कुंडलीत शनि शुभ स्थितीत असला तरी शुभ फल प्रदान करतं नाही. दुसर्‍या बाजूला याने अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
 
तर नक्कीच ही माहिती आपल्याला कामास येईल... आणि जरासी काळजी घेऊन आपण चांगले परिणाम प्राप्त करू शकता... तर अशाच प्रकाराच्या इतर माहितीसाठी आपण विजिट करू शकता मराठी.वेबदुनिया.कॉमवर... तर विजिट करा आणि आमच्यासोबत असेच जुळलेले राहा..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती