हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी 5 घरगुती वस्तू, अमलात आणा

मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (12:20 IST)
हिवाळा सुरू झाल्यावर गार वार्‍यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. अशात त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय येथे सांगण्यात येत आहे. या घरगुती वस्तू त्वचेवर वापरल्याने त्वचा नरम राहील- 
 
1. हिवाळ्यात शरीरावर ऑलिव्ह ऑयलने मालीश करावी. हे तेल त्वचेसाठी वरदान आहे ज्यात अँटीऑक्सीडेंट आढळतात. या व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यात मदत होते.
 
2. हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण एलोवेरा जेल वापरू शकता. याने त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळेल आणि त्वचा उजळेल.
 
3. या वातावरणात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी पपई देखील उपयोगी ठरेल. पपईची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर मालीश केल्याने फायदा होईल.
 
4. स्किन हेल्दी ठेवण्यासाठी बदाम तेल मदत करेल. आपली स्किन खूप अधिक ड्राय असल्यास आठवड्यातून दोनदा स्किनवर मालीश करावी. याने स्किनचा ओलावा टिकून राहतो. 
 
5. हिवाळ्यात दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. दह्याने चेहर्‍याची मालीश करून 20-25 मिनिट असेच राहू द्या. याने त्वचेवरील ड्रायनेस दूर होईल. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती