केसांसाठी टोमॅटो इतकं फायदेशीर आहे, आपल्याला माहीत आहे का

टोमॅटोत अॅटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. टोमॅटोचे सेवन करणे तसेच त्वचेवर फायदेशीर असतं त्याच प्रकारे केसांना टोमॅटो लावल्याने रुक्ष केसांमध्ये देखील चमक येऊन जाते.
 
टोमॅटो ज्यूस केसांना लावल्याने केसांचं रचना मुलायम होते आणि चमक देखील वाढते. 
टोमॅटो ज्यूस लावल्याने पीएच पातळी संतुलित राहते ज्यामुळे केस दाट होतात. 
टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे स्कॅल्पला मजबुती मिळते. 
टोमॅटो ज्यूस लावल्याने केस मजबूत होतात आणि दोन तोंडी केसांपासून देखील मुक्ती मिळते.
 
आपले केस रुक्ष झाले असल्यास किंवा आपण डँड्रफमुळे परेशान असाल तर टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मध मिसळून केसांवर लावा. अर्ध्या तासाने केस धुऊन घ्या. 
 
टाळूवर खाज सुटत असल्यास 3 टोमॅटोच्या पल्पमध्ये 2 चमचे लिंबाचा रस मिसळून टाळूवर लावा. अर्ध्या तासाने गार पाण्याने केस धुऊन घ्या. या वेळी शैम्पू वापरण्याची गरज नाही.
 
दाट केसांसाठी 2 चमचे एरंडेल तेल आणि 1 टोमॅटोची प्युरी मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट कोमट करून घ्या. ही पेस्ट टाळूवर लावा. स्कॅल्पवर मालीश करा. नंतर 2 तास असेच राहू द्या आणि मग केस धुऊन घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती