Orange Peel नैसर्गिक ब्लीच म्हणून कार्य करेल हा उपाय

सोमवार, 13 जानेवारी 2020 (11:32 IST)
साहित्य
दोन ते तीन संत्र्याची साल, पाणी किंवा गुलाब पाणी
 
वापरण्याची पद्धत
संत्र्याची साले बारीक करून भुकटी करा. या पावडरमध्ये पाणी किंवा गुलाबजल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट आठवड्यातून एकदा वापरली जाऊ शकते.
 
हे कसे कार्य करते?
संत्राच्या सालींमध्ये व्हिटॅमिन-सी असते, त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. संत्राच्या सालीं पासून बनविलेले पेस्ट देखील नैसर्गिक ब्लीच म्हणून कार्य करतात. याने त्वचेतील घाण निघून जाते ज्याने त्वचा नितळ होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती