जाणून घ्या चेहरा धुण्याची पद्धत …

प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. यामुळे तो कसा धुवावा हे माहिती असणे आवश्‍यक आहे. कारण तुम्ही चेहरा नेमका कशा पध्दतीने धुता यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. चेहरा धुताना हमखास होणाऱ्या चुका कोणत्या ते जाणून घेऊ.
 
सतत धुणे
चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या नादात काहीजण वारंवार फेस वॉश व क्‍लिंझरने तो धुतात. यामुळे त्वचेचे नुकसान होते. परिणामी त्वचा कोरडी किंवा तेलकट होते. तर तुम्ही मेकअप, सनस्क्रीन व अन्य कुठले लोशन लावलेले नाही तर मग चेहरा केवळ पाण्याने धुतला तरी चालेल. अशावेळी क्‍लिझिंग एकदाच करावे व रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
 
चुकीच्या उत्पादनांची निवड
क्‍लिंझरची निवड काळजीपूर्वक करावी. कारण त्याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. क्‍लिंझर खूप स्ट्रॉंग असू नये व खूप सौम्यही असू नये.
 
स्क्रबिंग
चेहऱ्यावरील डेड सेल्स निघुन जाण्यासाठी स्क्रबिंग उपयुक्त आहे. मात्र आठवडयातून केवळ दोन किंवा तीन वेळा स्क्रबिंग करावे. त्यापेक्षा जास्त केल्यास त्वचेचे नुकसान होते. तसेच स्क्रबिंगसाठी कापूस किंवा कपडयाचा वापर न करता बोटांचा वापर करावा.
 
अपूरी स्वच्छता
घाईघाईने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर केमिकल्स तसेच राहतात व चेहऱ्यावरील छिद्रे बुजतात. परिणामी त्वचा कोरडी पडते. अशावेळी कितीही वेळ लागला जरी आळस न करता चेहरा नीट स्वच्छ धुवावा.
 
चेहरा घासून पुसणे
अनेकजण धुतल्यानंतर तो टॉवेलने घासून पुसतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहरा सुती कपड्याने पुसावा व घासून पुसण्याऐवजी फक्त हलक्‍या हाताने टिपावे. तसेच दुसऱ्याचा टॉवेल किंवा कापड वापरू नये. जंतूसंसर्ग होण्याची भीती असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती