केसांची निगा : केसांना तेल कधी आणि कसे लावावे

गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (16:51 IST)
केसांसाठी तेल लावणं किती आवश्यक आहे हे सर्वानांच माहित आहे. पण सध्याच्या व्यस्त आणि धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात या पासून सर्व लांबच राहतात. पण त्यांना हे माहितच नसत की असं करणं त्यांच्या केसांसाठी हानिकारक असत. म्हणून केसांना पोषण मिळणे खूप आवश्यक असते. त्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक असतं.
 
जेणे करून केस निरोगी राहतील. पण आपणास माहित आहे का की केसांना तेल लावण्याची देखील योग्य आणि चुकीची पद्धत आहे, या व्यतिरिक्त जर योग्य वेळी तेल लावले तर हे आपल्या त्वचे साठी फायदेशीर असत. 
 
सर्वप्रथम तेल कधी लावायचे हे जाणून घेऊ या. आपण तेल कधीही लावू शकता परंतु महत्त्वाची बाब अशी की आपण तेल लावून घराच्या बाहेर पडू नये. कारण जर आपण असे करता, तर प्रदूषण मुळे आपले केस खराब होऊ शकतात. म्हणून प्रयत्न करा की आपण रात्री झोपतानाच तेल लावावे. 
 
रात्री तेल लावल्यानंतर झोपा
सकाळी उठल्यावर आपल्या केसांना शॅम्पूने धुऊन घ्या. यामुळे रात्र भर आपल्या केसांना चांगल्या प्रकारे पोषण मिळेल या मुळे आपली त्वचा देखील निरोगी होईल. रात्र भर तेल लावून झोपल्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाही, पण जर आपली त्वचा तेलकट असल्यास, तर रात्रभर तेल लावून ठेवू नका. केस धुण्याच्या 2 तास पूर्वी केसांना तेल लावा.
 
तेल कसं लावावे -
आपण केसांना तेल लावण्यापूर्वी त्याला कोमट करा. बोटांचे टोकं बुडवून केसांच्या मुळात तेल लावून मालिश करा. हे लक्षात ठेवा की आपल्याला केसांना मालिश हळुवार हातांनी करावयाची आहे अन्यथा केस तुटू शकतात. केसांना धुण्यापूर्वी केसांना वाफ द्या. या मुळे केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचेल आणि केस निरोगी आणि चमकदार होतील. तसेच शॅम्पूला पाण्यात घोळून केसांवर वापरा. ही केस धुण्याची योग्य पद्धत ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती