चमकदार नितळ त्वचेसाठी घरघुती नैसर्गिक उपाय

सोमवार, 30 डिसेंबर 2019 (13:41 IST)
१. भरपूर पाणी प्या :
 भरपूर पाणी प्यावे जेणे करून आंतरिक स्वच्छता होऊन शरीरातील घाण बाहेर पडून शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते. आणि त्वचा तजेल होते.
२.  ताजे रस प्या :-
दर रोज कमीत कमी 2 ग्लास ताज्या फलांचा रस प्यायला पाहिजे. रस त्वचेला पोषण देऊन त्वचेला तेजवान आणि सुंदर करते.
३. चांगली झोप :-
आपण नेहमीच कामाच्या ताण तणाव असतो. त्यामुळे थकवा येतो आणि झोप पण पुरेशी होत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्यासाठी  किमान 8 तासाची झोप हवी. 
४. लिंबू :-
आपल्या आहारात लिंबाचा वापर करावा. लिंबात व्हिटॅमिन सी चा समावेश असतो. व्हिटॅमिन सी शरीरातील घाण बाहेर काढण्यात मदत करंत. लिंबाच्या रसाला सॅलडवर टाकून सेवन करावे किंवा  गरम पाण्यात देखील घेऊ शकता. 
५. अक्रोड:-
अक्रोड ह्यात ओमेगा ३ फॅटी एसिड असतं. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. अक्रोडाच्या तेलाने त्वचेवर चांगली मॉलिश केल्याने त्वचेचा रंग उजळून तारुण्य येतं.
६. संत्री :- 
संत्रीमुळे त्वचा उजळते. संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यास त्वचेला फायदा होतो. तसेच संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवून लावल्याने त्वचा तजेल आणि चमकदार होते. 
७.:- डाळी:- 
डाळीत प्रथिने भरपूर असतात. दर रोज डाळीचे सेवन केल्याने शरीरातील त्वचेच्या नव्या पेशी बनतात. ह्या पेशी त्वचेला चमकदार आणि तेजस्वी करतात.
८. डाळिंब :-
डाळिंबामध्ये अँटीऑक्सीडेंट आढळतात. हे त्वचेस व्रण आणि कुठल्या ही जखमा त्वरित बरे करण्यास मदत करतात. डाळिंबाच्या रसाचे दर रोज सेवन केल्याने शरीरात रक्ताची वाढ़ होऊन त्वचेचा  रंग उजळतो आणि त्वचा सतेज दिसते.
९. अंडी :-
अंडी आपल्या शरीराला धड धाकट करते. त्यासोबत त्वचेचे ही रक्षण करते. त्वचेला तेजाळ आणि सुंदर करते. दर रोज आपल्या आहारात अंड्यांचे सेवन केल्याने चमकदार त्वचा होते. 
१०. केळीचे मास्क :-
 केळींना मॅश करुन त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून किमना एकदा असे केल्याने  त्वचा चमकदार सतेज होते.
११. टोमॅटो :-
टोमॅटोचे जेवण्यात नियमित सेवन केल्याने शरीर तारुण्य रहातं. त्वचेचं फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण होतं आणि त्वचा उजळते.
१२. मासे :- 
माश्यांमध्ये ओमेगा 3 सत्व आढळतं. हे त्वचेसाठी अतिशय महत्वाचं जीवनसत्व आहे. 
१३. ग्रीन टी  :-
हा एक हर्बल चहा आहे. जे सूर्यापासून बर्न होत असलेल्या त्वचेसाठी प्रभावी आहे. याचे सेवन केल्याने त्वचेवरील डाग, व्रण, दूर होतात. त्वचा मऊ होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती