यापैकी एक पदार्थाचे सेवन करा, चेहर्‍यावर तेज मिळवा

शनिवार, 23 जानेवारी 2021 (09:43 IST)
कोणतेही केमिकल न वापरता चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात त्याच संदर्भात आज आम्ही आपल्याला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्याचे सेवन करुन आपण सुदंर आणि तजेल त्वचा मिळवू शकता.
 
चीकू
दिवसाला एक चीकू खाल्ल्याने आपल्याला ताजेतवाने जाणवेल. चीकूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि ग्लुकोज सारख्या पोषक घटकांमुळे थकवा दूर होण्यास मदत होते. ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराला विश्रांती मिळते.
 
पाईनअॅप्पल
अननसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीज आणि पोटॅशियम या सारखे पोषक घटक असतात. पाईनअॅप्पल खाल्ल्याने ताजेतवाने जाणवतं. शरीराला ऊर्जा मिळते. याचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह वाढतो ज्यामुळे चेहर्‍यावर तेज येते.
 
चॉकलेट किंवा आईसक्रिम
योग्य प्रमाणात चॉकलेटचं सेवन केल्याने लगेच शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. चॉकलेट खाल्ल्याने मूड देखील चांगला राहतो. किंवा आपण आवडत्या फ्लेवरचे आईस्क्रीम खाऊन देखील आनंदी होऊ शकता. चॉकलेट किंवा आईसक्रिम खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती