कोंड्यामुळे वैतागला आहात, तर मग हे करून बघा

मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (10:15 IST)
केसांचे सौंदर्य आपल्या सौंदर्यात वाढ करतात. पण केसांमध्ये काही समस्या असल्यास ही काळजीची बाब असते. कोंडा होणं केसांच्या समस्यांमधील एक मोठी समस्या आहे. जी टाळूच्या कोरड्या त्वचेमुळे होते, ज्यामुळे केसांमध्ये अनेक समस्यां उद्भवतात. आज आम्ही आपणास काही घरघुती उपाय सांगत आहो, ज्यामुळे डोक्यातील कोंड्यातून सुटका होऊ शकते.

1 केसांना निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी डोक्यावर मालीश करा. केसांना पुरेसं तेल न मिळाल्याने डोक्यात कोंडा होतो. यासाठी केसांमध्ये नारळाच्या तेलाची किंवा ऑलिव्ह तेलाची मॉलिश करावी.
 
2 कोंड्यापासून सुटक्यासाठी लिंबाच्या रसात मध मिसळून मॉलिश करावी किंवा या मधील कोणत्याही तेलाला मिसळून देखील मॉलिश करू शकता.
 
3 ऑलिव्ह तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. यामध्ये मध मिसळून लावल्यावर कोंडा नाहीसा होतो.
 
4 दह्यामध्ये नैसर्गिकरित्या एसिड असतं. जे कोंड्याला नाहीसे करण्यात मदत करतं. या साठी आपल्याला दह्यामध्ये हरभराच्या डाळीचे पीठ मिसळून डोक्याला लावायचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती