रात्री झोपण्याच्यापूर्वी त्वचेशी निगडित या चुका करू नये, अन्यथा चेहरा खराब होईल

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (10:39 IST)
दिवसात तर आपण सर्वजण आपल्या त्वचेची काळजी घेतो. या साठी मॉइश्चरायझर पासून सनस्क्रीन देखील वापरतो. परंतु रात्री झोपण्याच्या पूर्वी देखील आपल्या त्वचेची निगा राखणं गरजेचे असतं. कारण रात्रीच्या वेळीस त्वचा आपल्या टिशूचे दुरुस्ती करते. रात्रीच्या वेळेस घेतलेल्या काळजीमुळे सकाळी आपली त्वचा तजेल दिसते. परंतु काही केलेल्या चुका त्वचेच्या चकाकी कमी करण्यासाठी पुरेश्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्वचेशी निगडित काय आहे त्या चुका ज्या आपण कळत- नकळत करतात. 
 
उशीचा वापर - 
बरेच लोक रात्री झोपताना उशीचा वापर करतात. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यातून बाहेर पडणारे तेल आणि केस उशीवरच पडतात. जेणे करून उशीत जिवाणू वाढतात. सतत एकाच उशीचा वापर त्वचेवर मुरुमाला कारणीभूत असतात. म्हणून दर चार दिवसाने उशीच्या खोळी बदलाव्या.
 
ओठांना मॉइश्चराइझ करणं - 
बऱ्याच वेळा लोकं चेहऱ्याच्या काळजी घेण्यासह नाइट क्रीम लावणं विसरत नाही पण जेव्हा गोष्ट येते ओठांच्या काळजीची तर ते दुर्लक्ष करतात. ज्यामुळे ते कोरडे आणि निर्जीव दिसतात. ओठाची त्वचा पातळ असते. त्यामुळे यांची जास्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणून रात्री झोपण्याच्या पूर्वी लीप बॉमचा वापर करावा.
 
त्वचेला स्वच्छ राखणं - 
बऱ्याच वेळा लोकं त्वचेला स्वच्छ करण्याच्या नादात अती जास्त प्रमाणात स्वच्छ करून देतात. प्रत्येक वेळी तोंड धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फेसवॉश मुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. ज्यामुळे ब्रेकआउट्स होणं आणि नैसर्गिक चमक कमी होण्याची भीती असते. म्हणून गरजेपुरते फेसवॉश त्वचेला स्वच्छ करण्यासाठी वापरावं.
 
पुरेशी झोप - 
आपणास नेहमीच तजेल आणि टवटवीत त्वचा हवी असल्यास ब्युटी स्लिप घ्या. म्हणजे किमान 6 तासापेक्षा जास्त झोपणं. या पेक्षा कमी झोप घेतल्यामुळे त्वचेला दुरुस्त होण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे त्वचा निस्तेज, आणि फुगलेली दिसते. तसेच सुरकुत्या आणि डार्क सर्कल देखील लवकर होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती