हिवाळ्यात आंघोळ करताना घ्या विशेष काळजी

मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (12:55 IST)
हिवाळ्यात आंघोळ केल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा जात नाही. या दिवसात वातावरणात त्वचा अधिक कोरडी पडते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळ करताना त्वचेची विशेष काळजी घ्यावी.
 
हिवाळ्यात आंघोळीसाठी दुधात सुगंधी उटणे भिजवून त्याचा वापर करावा. या दिवसांत शक्यतो साबणाचा वापर टाळावा, शक्य झाल्यास ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर केला तर चालेल. त्यामुळे त्वचा मऊ राहते. आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला ग्लिसरीन किंवा मॉईश्चरायझर लावावे, पण हे लावल्यानंतर टाल्कम पावडर लावण्याचे टाळावे.
 
हिवाळ्यात सर्वांत जास्त काळजी पायांची घ्यावी लागते. कारण या दिवसांत पायांना भेगा पडतात. भेगा कमी करण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर लगेचच तळपाय प्युमिक स्टोन किंवा वझरीने रगडून घासावे. पाय वाळण्यापूर्वीच त्यावर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर लावावे. पाय जास्त कोरडे पडू नये म्हणून हिवाळ्यात मोज्यांचा वापर करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती