नखेच्या जवळच्या निघणाऱ्या कातडीमुळे होणार त्रास असा टाळा

रविवार, 4 एप्रिल 2021 (17:04 IST)
बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे नखाच्या जवळची कातडी निघते आणि ती खूप वेदना देते. या मुळे जळजळ देखील होते. बऱ्याच वेळा या मधून रक्त देखील येत. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.  
 
1 व्हिटॅमिन ई  तेल - त्वचे साठी व्हिटॅमिन ई तेल फायदेशीर आहे. कोरड्या त्वचे साठी नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई तेल मिसळा. हे मिश्रण नखाच्या भोवती कोरड्या त्वचे वर लावा. रात्रभर लावून ठेवा.सकाळी कोरडी त्वचा नाहीशी होईल. 
 
2 दूध -दुधात लॅक्टिक एसिड त्वचे साठी फायदेशीर आहे. हे त्वचेला मऊ बनवतो. अँटी बेक्टेरियल असल्यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ देत नाही. या साठी एका वाटीत दूध घेऊन त्यात गुलाबपाणी मिसळा. बोटांना या मध्ये 5 मिनिटे  बुडवून ठेवा. नंतर हात कोरडे करून घ्या. 
 
3 मध -मध त्वचेसाठी फायदेशीर आहे. मधात अँटिसेप्टिक असल्यामुळे जखम लवकर भरते. मध नखाच्या भोवती निघालेल्या त्वचे वर लावा आणि तसेच ठेवा बोट पाण्याने स्वच्छ करून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती