Lal kitab astrology 2020 : आपली आयू 24 ते 28 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (11:14 IST)
लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात जागृत होतो आणि आपले चांगले- वाईट फळ देतो. जर आपले वय 24 ते 28 वयोगटातील असेल आणि आपले अजून विवाहाचे योग आले नसतील तर आपण खालील  दिलेले 5 उपाय अमलात आणावे तर आपले संपूर्ण वर्ष विलक्षण जाऊ शकेल आणि आपणास यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल.
 
ह्या वयोगटातील व्यक्तींनी हे 5 उपाय अमलात आणल्यास इच्छित यशाची प्राप्ती होईल आणि चंद्र आणि शुक्र ग्रह यश संपादन करण्यास साहाय्य करतील.
 
सर्वप्रथम चंद्रासाठी 5 उपाय :-
 
१ दररोज आईच्या पाया पडावे.
२ महादेवाची भक्ती आणि दर सोमवारी व्रत करावे.
३ दर सोमवारी खीर वाटप करा. (स्वतः सेवन करू नये.)
४ स्वच्छ भांड्यात पाणी किंवा दूध घालून रात्री उशाशी ठेवून झोपावे. सकाळी बाभळाच्या झाडाला घालावे.
५ तांदूळ, पांढरे वस्त्र, शंख, पांढरे चंदन, पांढरी फुले, साखर, बैल, दही, आणि मोती या वस्तूंचे दान केल्याने चंद्र प्रबळ होण्यास मदत होते.
 
टीप:- चंद्र प्रबळ असल्यास हे दान करू नये. 
 
शुक्रासाठी 5 उपाय:- 
 
१. दर शुक्रवारी उपवास करून लक्ष्मीची पूजा करावी.
२ पांढरी वस्त्र दान करावी. गायी, कावळे आणि कुत्र्यांना जेवणातील एक- एक भाग द्यावा.
३ दर शुक्रवारी उपवास करावे. शुक्रवारी आंबट पदार्थांचे सेवन टाळावे.
४ स्वतःला आणि घराला नेहमीच स्वच्छ ठेवावे.
५ दोन मोती घेऊन त्यांना पाण्यात घालावे आणि स्वतः कडे हे जपून ठेवावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती