मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (20:50 IST)
जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण - महिमा ॥धृ॥
वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥
सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
द्रोणाचळ गिरि अणिला । बंधु लक्ष्मण वांचंविला ॥३॥
निरंजन तवपायीं । भावें ठेवित येउनि डोई ॥४॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती