श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय - प्रकाश आंबेडकर

सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (17:29 IST)
महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांनाच आरक्षण नकोय, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. "महाराष्ट्रात 288 पैकी 182 श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसाठी इतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात. 
 
गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत," असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
 
तसंच, गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांविरूद्ध स्वत:चा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असं आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केलं.
 
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने हा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती