मराठा आरक्षण बैठक, उदयनराजे बैठकीला अनुपस्थित

बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (18:01 IST)
मी मराठा समाजाचा सेवक आहे म्हणून माझी ही खुर्ची समाजाच्या बरोबर पाहिजे असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केले. ते मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. वाशीच्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने माथाडी भवन येथे ह बैठक पार पडली. यावेळी  उदयनराजे या बैठकीस अनुपस्थित राहीले. तर संभाजीराजें दोन मिनिंट संवाद साधला.  
 
राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी ११ ऑक्टोबर २०२० ला आयोजित केलेली एमपीएससीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी तसेच जोपर्यत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतेही ठोस निर्णय होत नाही तोपर्यत राज्य शासनामार्फत  पोलीस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या शासकीय  भरती घेऊ नये त्या पुढे ढकलण्यात यावी यावर चर्चा झाली. 
 
एससीबीसीच्या अंतर्गत  राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण जाहीर केल्याप्रमाने सप्टेंबर २०२० च्या अगोदर शिक्षणामद्ये १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शेजारील राज्य तमिळनाडू आणि केंद्र शासनाच्या सुपर निम्रील प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील मराठा समाजासाठी तरतूद करावी हा विषय देखील चर्चेत आला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती