मराठा आरक्षणावर राज्य सरकारची मोठी घोषणा

मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (19:41 IST)
मराठा आरक्षण मुद्दा पेटून उठलं आहे.मराठा आरक्षण मिळावं या साठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. ते म्हणाले मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल त्या नंतर आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मागासवर्गीय आयोग महिन्याभरात अहवाल सादर करेल त्यांनतर अहवालाचे अवलोकन करून हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. 

यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, या मागासवर्गीय अहवाल बाबतीत आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही या अहवालाची मागणी आम्ही केलेली नाही. या मध्ये शंका आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अन्यथा पुन्हा आंदोलन पुकारले जाईल. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. फेब्रुवारीचा कालावधी आम्हाला मान्य नाही. 
 
Edited By- Priya DIxit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती