संक्रांतीला पतंग का उडवतात, जाणून घ्या महत्त्व

मंगळवार, 12 जानेवारी 2021 (21:27 IST)
संक्रांत आणि पतंग याचं एक गोड नातं आहे. जानेवारीच्या मध्यार्द्ध कोमट सूर्यप्रकाश, हातात तिळगूळ, आणि रंग बिरंग्या पतंगाने आकाश भरलेले. प्रत्येक पतंग दोऱ्याच्या साहाय्याने इकडे तिकडे फिरत असे. जणू उत्तरायण करताना सूर्यदेवाच्या स्वागतासाठी आतुर आहे. आकाशात किती तरी पतंग सूर्यनारायणाची आरती करण्यासाठी आतुर असतात. आपण सर्व या नाजूक पतंगाच्या दोऱ्याला खूप आशा आणि धैर्याने धरून ठेवतो.
 
तसेही पतंगला शुभता, स्वातंत्र्य व आनंदाचे प्रतीक मानले गेले आहे म्हणून शुभ काळ आगमन होण्याच्या आनंदात पतंग उडवण्याची प्रथा आहे. दुसरीकडे वैज्ञानिक दृष्ट्या उत्तरायणात सूर्याच्या उष्णतेत शीत प्रकोप तसेच हिवाळ्यात होणार्‍या आजारांना दूर करण्याची क्षमता असते. अशात लोकं घरातून बाहेर पडून उन्हात पतंग उडवतात ज्याने सूर्य किरण औषधाप्रमाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
 
एकूण पतंग फक्त छंद आहे किंवा खेळ नसून या नाजूक पतंगात जीवनाचे सार दडलेले आहे. चला, पतंगाकडे नव्या रूपात पाहूया, याहून काही शिकायला मिळतंय हे बघूया-
 
आकाशात भरारी घेण्याची इच्छा
संतुलित व्यक्तिमत्त्व
विश्वासाची दोरी
आव्हानात्मक
पराभव स्वीकार करण्याची हिंमत
उंचावत राहणे
अशक्य काहीही नाही
आनंद घेत आनंद वाढवा
 
चला मग आता या संक्रांतीला पतंगांना बघून आपण पण पतंगां सारखे जीवन जगू या...
नाजुक, रंगीत, संतुलित, आशा आणि विश्वास, उत्साहाने भरलेले आणि आकाशात भरारी घेण्यास सज्ज.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती