अदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यास आम्ही कधीही तयार मुख्यमंत्री

सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:31 IST)
शिवसेनेचे युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यास आम्ही कधीही तयार आहोत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. ‘महा जनादेश यात्रे’दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. गेल्या वेळी २०१४ मध्ये शिवसेनेच युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने १४४ जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. आता अर्ध्या जागा घेऊन काही मित्रपक्षांनाही देण्याचा आमचा मानस आहे. आता आम्ही किती जागा जिंकू ते नक्की सांगता येणार नाही, मात्र यावेळचा विजय ऐतिहासिक असेल इतके नक्की, असेही फडणवीस म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती होणारच हे स्पष्ट आहे. आम्ही मोठा पक्ष असलो तरी मित्रपक्षाला बाजूला सारायचे ही आमची नीती नाही. आम्ही समान जागांवर लढणार आहोत. या जागा १३० ते १४० इतक्या असतील. उर्वरित जागा आम्हाला मित्रपक्षांनाही द्यायच्या आहेत. या पुढील निवणूक आम्ही केवळ विकास याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही राज्यातल्या जनतेला चांगले सरकार दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती