आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करा असे सांगितले, शिवसेना मागे तर भाजपाचे नेते म्हणतात

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:07 IST)
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवले आहे. सध्या आमची भूमिका ही वेट अँड वॉचची असून, आम्ही योग्य वेळीची वाट पाहत आहोत असे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले आहे. सर्व राजकीय नाट्य सुरु असतांना भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात अजूनही सत्ता स्थापनेचा पेच कायम असून, भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवली आहे. तर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला बोलावले होते, मात्र शिवसेनेला चोवीस तासांच्या आत त्यांचा दावा सिद्ध करता आलेला नाही.
 
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी चर्चा होऊन सुद्धा, शिवसेनेला त्यांच्या पाठिंब्याची पत्र मिळाले नाही. सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते राजभवनावर गेले होते. तर आम्हाला मुदत द्या अशी मागणी त्यांनी केली मात्र ही मुदत त्यांना मिळाली नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तसंच सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली होती, मात्र या सगळ्याचा उपयोग पाठिंबा मिळवण्यासाठी झाला नसल्याचंच समजते असून, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यांना उद्या रात्री ८.३० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भाजपा आणि राष्ट्रवादीकडे लागले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती