आमदार भास्कर जाधव शिवसेनेत जाणार ?

बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (16:32 IST)
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्याची कबुली दिली आहे. कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
 
‘होय, माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं आमंत्रण मला दिलं आहे. मात्र याविषयी कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे.’ असं भास्कर जाधवांनी स्पष्ट केलं. जाधव यांनी प्रस्ताव मान्य केल्यास 15 वर्षांनी शिवसेनेत त्यांची घरवापसी होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती