जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे

सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (16:14 IST)
येथिल मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट शासन न केलेली काम तुमच्या आमच्या माथी मारण्यासाठी राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असते. राज्य सरकाराच्या प्रत्येकी तासाला दहा जाहिराती दाखविली जाते, एक जाहिरातीसाठी साधरणत: १२ हजार रुपये इतका खर्च करवा लागतो.
 
त्यामुळे राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. पूर्वी आई- वडिल सांगायचे जाहिराती बघून तेल आणि साबण यांच्यासारख्या वस्तू निवडायच्या असतात सरकार निवडायचे नसते, असं म्हणत त्यांनी शासनाच्या जाहिरांतींवर टीकास्त्रं सोडलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती