#पुन्हानिवडणूक चा ट्विटवर हॅशटॅग, कॉंग्रेसकडून कलाकारांवर आरोप

शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (15:57 IST)
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सोबत येऊन सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केले आहेत.
 
मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे. कलाकार असे ट्विट करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती