भुजबळ जाणार शिवसेनेत संजय राऊत यांची नाशिकमध्ये प्रतिक्रिया

गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:20 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. येवला येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडलं. राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असं आश्वासन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलं. मी आहे तिथे बरा आहे असं भुजबळांनी काल सांगितल्यानं त्यांच्या प्रवेशाबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती