हरिद्वारमध्ये महाकुंभाची जय्यत तयारी सुरू

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (19:15 IST)
हरिद्वारमध्ये वर्ष 2021 मध्ये लागणाऱ्या महाकुंभ मेळावा ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी  प्रथमच या महाकुंभामध्ये पोर्टलच्या द्वारे नोंदणी केल्यावरच मेळाव्यात प्रवेश करता येईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे प्रथमच  घडणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून लागणाऱ्या या महाकुंभात प्रथम स्नान 14 जानेवारी पासून सुरू होणार आहे. जे 30 एप्रिल 2021 पर्यंत असेल. दरवर्षी या महाकुंभात एकावेळी सुमारे 6 लाख पेक्षा अधिक भाविक गंगेत स्नान करायचे पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे पोर्टलच्या द्वारे केवळ 1 लाख लोकच एका वेळी स्नान करतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती