शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारीची ऑफर!

रविवार, 21 एप्रिल 2024 (13:21 IST)
लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जवळ येत असून सर्व पक्ष एकमेकांना धक्के देत आहे. महायुती आता ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. महायुती कडून ठाकरे गटाचे विश्वासू आणि स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना उमेदवारीची ऑफर दिली जात असल्याचे सूत्रांनी संगितले.असं करून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरु आहे. 

माविआ कडून जागा वाटप झाल्या आहे. मात्र महायुती कडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केला नाही. या मतदार संघासाठी महायुतीला योग्य उमेदवार सापडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे देखील आता महायुतीत शामिल झाले आहे. या नंतर बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्रमनसेने फक्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

आता या मतदार संघासाठी मंगलप्रभात लोढा इच्छुक असल्याचे समोर आले असता आता मिलींद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. नार्वेकरांना येत्या दिवसांत पक्ष प्रवेश देऊन उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि अत्यंत विश्वासू आहे. त्यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहे. 
 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती